कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन वर्षाकरीता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या एक सराईत गुन्हेगाराला शाहूपुरी पोलिसांनी आज (शनिवार) अटक केली आहे. रसुल अन्वर सय्यद (वय २७, रा. शाहू कॉलेज समोर, विचारे माळ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेला रसूल सय्यद ह्याच्यावर घरफोडी, चोरी, मारामारी असे एकूण २८ गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी चोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे घडत असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना हद्दपार करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला आज दोन वर्ष हादपार असलेल्या सराईत गुन्हेगार रसूल सय्यद हा निशा हॉटेल चौकामध्ये येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने त्याठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे. शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे, प्रकाश भंडारे, युवराज पाटील, प्रशांत घोलप, अनिल पाटील, दिगंबर पाटील, दिग्विजय चौगुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.