कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळंबे येथे आज (शुक्रवार) सकाळी एसटी-कारच्या धडकेत कारमधील तिघांचा मृत्यू झाला होता. तर जखमी झालेल्या चौघांवर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात उपचार सुरू होते. यातील गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा आज सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूजा संजय माळवे (वय ३६) असे तिचे नाव आहे. यामुळे या अपघातातील मृतांची संख्या चार झाली आहे.
या अपघातामध्ये आक्काताई दिनकर माळवे (वय ६५) करण दीपक माळवे (वय २७) संजय दिनकर माळवे (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या समर्थ संजय माळवे (वय १६) नंदा दीपक माळवे (४०) व सुनिता भगवान चौगुले (५०) यांच्यावर उपचार सुरू आहेत.