आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अशी माहिती आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि सुतगिरणीचे नवनिर्वाचित संचालक डॉ. अनिल देशपांडे यांनी दिली. तसेच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले.

राज्यातील सूतगिरणी अडचणीत असताना देखील संचालक मंडळाने काटकसर करून सुतगिरणीचे उत्पादन सुरु केले आहे. गिरणीचा रेडिमेड विभाग अल्पावधीतच नावारूपाला आला आहे. कामगारांच्या पगारवाढीसह गिरणीने वीजबिल ही वेळेत भरली आहेत. सुतगीरणीची वाटचाल सुस्थितीत चालू आहे.

अण्णाभाऊ संस्थेचे प्रमुख अशोक अण्णा चराटी म्हणाले, चांगल्या कारभाराला सभासदांचे नेहमी सहकार्य असते. राज्यातील उत्कृष्ट सूतगिरणीमध्ये या गिरणीचा समावेश आहे. त्यामुळे संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले. मंध्यतरीच्या काळात सूतगिरणीला वाईट दिवस आले होते. मात्र, खडतर प्रवासात आम्ही कारभार नेटाने चालविला त्याची पोचपावती आज सभासदांनी दिली आहे.

नवनिर्वाचित संचालक पुढील प्रमाणे-

(उत्पादक गट) – श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी, अशोकअण्णा चराटी, डॉ.अनिल देशपांडे, डॉ.संदीप देशपांडे, नारायण मुरूकटे, डॉ. इंद्रजित देसाई, जी.एम.पाटील, सुधीर कुंभार, रजनीकांत नाईक, अविनाश सोनटक्के, जयसिंग देसाई, शंकर टोपले. (भटक्या विमुक्त जातीजमाती) – कृष्णात गिरीगोसावी, (अनुसूचित जातीजमाती) – शशिकांत सावंत,  (महिला  राखीव गट) – मालुताई शेवाळे, मनीषा कुरूणकर, (बिगर उत्पादक) -राजाराम पोतनीस असे आहेत.