कोल्हापूर (प्रतिनिधी) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या ५० टक्के अनुदान योजनेसाठी ४० टक्के आणि बीज भांडवल योजनेसाठी १६ टक्के उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सन २०२१-२१ मध्ये या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या चर्मकार, ढोर, होलार समाजातील गरजू व आर्थिकदुष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.