मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार प्रतिवार करायची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचेच बघा ना..! दोघे एक एकमेकांवर निशाणा साधण्याची एक ही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा शरद पवार आणि अजित पवार गट वेगळा झाला तेव्हा खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना साथ दिली. तेव्हा पासून दोघांमध्ये वैर निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करत आहे . काही दिवसांपूर्वी तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट खासदार हवा, अशा शब्दात अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हेवर निशाणा साधला होता. आता खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर सोशल मीडियावर सडेत्तोर उत्तर दिले आहे.

कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रतिउत्तर

कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की… असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती. पुढे अमोल कोल्हे असेही म्हणाले की, २००१ साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर.. आणि योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो… ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर… म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना टोले लगावले आहेत.

काय बोलले होते अमोल कोल्हेंना अजित पवार..?

शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत खासदार अमोल कोल्हे सडकून टीका केली. तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट खासदार हवा, अशा शब्दात अजित पवारांनी नाव न घेता कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला होता.