पेठवडगाव (प्रतिनिधी) : येथील ग्रामदैवत अंबाबाई आणि बिरदेव-अवघड खान पालखी, सार्वजनिक सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तरी भाविकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गुरूप्रसाद यादव,पालखीचे मानकरी धनाजी पाटील, रणजितसिंह यादव आणि भोपळे परिवार यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रमाना बंदी घातली आहे. त्यामुळे शारदीय नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी सुद्धा याबाबत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकत्र येऊ नये, असे आवाहन केले आहे. याबाबत तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या कार्यालयात प्रशासन अधिकारी आणि महालक्ष्मी, बिरदेव-अवघड खान देवस्थान कमिटी, नागरिक यांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे, तलाठी राजाराम जाधव, सचिन पाटील, सुहास जाधव, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.