कसबा बावडा (प्रतिनिधी) :  कसबा बावडा येथील जीवन कल्याण माध्यमीक विद्यालयमधील १९९९ च्या बॅचमधील इयत्ता १० वीच्या बॅचने मदतीचा हात देऊ केला आहे. श्रीराम सांस्कृतीक भवन, कसबा बावडा येथे ना. सतेज पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांचे संकल्पनेतून उभारलेल्या कोव्हिड सेंटरला २०० ऑक्सिजन पाईप आणि २०० हँण्डग्लोव्ज जीवन कल्याण माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांनी, माजी विद्यार्थ्यांनी कोव्हिड सेंटरला केलेली ही मदत निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने केलेली मदत आदर्शवत ठरेल. या उपक्रमाचा आदर्श भविष्यामध्ये आत्ताच्या विद्यार्थ्यांनी जोपासावा, अशी अपेक्षा व्यकत केली.

याप्रसंगी श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील, उपसभापती संतोष पाटील, कोव्हिड सेंटर प्रमुख गजानन बेडेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, माजी उपसभापती संतोष ठाणेकर, पतसंस्थेचे चेअरमन उत्तम कामीरकर, शिवाजी पाटील, प्रदिप पाटील, शिवराज जगताप, संतोष लोहार, विशाल वाडकर, वासीम गोलंदाज, अभिजीत पाटील, पवन साळोखे, प्रदिप उलपे, प्रकाश पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते.