बारामती – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आपला पक्ष किती श्रेष्ठ हे लोकांना दाखवण्याचे काम सध्या पक्षामार्फत सुरु आहे. अशातच भाजपने सुद्धा आपली कंबर कसली आहे. सर्व ठिकाणी कार्यकर्ते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या कामाला लागले आहेत. ठिक ठीकाणी सभा घेत पंतप्रधान नरेंद्र ,मोदींचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कार्यकर्त्याना दम देत असल्याचे पाहायला मिळाले . गुंडगिरी, दादागिरी दहशत मी खपवून घेणार नाही. कुठलीही व्यक्ती असो, ती खपवून घेतली जाणार नाही”, असं अजित पवार यांनी आज बारामतीत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हे तुमच्या आमच्या घरातील लग्न नाही, माझा फोटोच नाही, माझं नावच घेतलं नाही, असं चालणार नाही. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे. तुम्ही निधीची चिंता करू नका. सगळे निधी मिळतील. अनेक निधी आमच्या भागात दिले आहेत. आम्ही करून दाखवलं आहे”, असा दावा अजित पवार यांनी केला. “गुंडगिरी, दादागिरी दहशत मी खपवून घेणार नाही. कुठलीही व्यक्ती असो, ती खपवून घेतली जाणार नाही”, असं अजित पवार म्हणाले. “विरोधकांना प्रचाराचा मुद्दा नाही म्हणून ते सांगत आहेत. पुढे निवडणुका होणार नाहीत. संविधान बदलणार आहेत. पण यावर स्वतः मोदी स्पष्ट बोलले आहेत. विरोधक दिशाभूल करत आहेत. यावर अजिबात विश्वास ठेवू नका”, असं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे