मुंबई (प्रतिनिधी) : बीसीसीआयने केंद्रीय कराराबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांना वार्षिक केंद्रीय करारातून वगळण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ आता बीसीसीआय कसोटी संघासाठीसुद्धा अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांच्या नावाचा विचार केला जाणार नाही.

अजिंक्य, इशांतसाठी वाईट बातमी असली तरी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलसाठी उत्साह वाढवणारी बातमी ठरणार आहे. कारण या दोघांनाही बीसीसीआयने केंद्रीय करारात बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अंतिम यादीवर बीसीसीआयच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.