कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र कधी संपत नाही, महाराष्ट्र संपवतो, सध्या आपलं राज्य वेगळ्या मनस्थितीतून जात असून परिस्थिती भयंकर आहे. राज्यातील रोजगाराचे प्रकल्प गुजरातला जात आहेत. यासह राज्य कर्त्यांच्या कारभारावर ताश्चर्य ओढत आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर, गारगोटी येथे उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार गेल्या 75 वर्षांपासून पंतप्रधानांपासून ते सर्व प्रतिनिधी संविधानाला स्मरुन कारभार करत आले आहेत. सध्या ही असाच कारभार असेल तर 40 गद्दार अपात्र होतील. पण जर भाजपच्या संविधानाप्रमाणे गेले तर मग काय निर्णय येईल माहीत नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाबासाहेब यांच्या संविधानाची बाजू घेऊन निर्णय घ्यावा, असे ही ते यावेळी म्हणाले.

यावेळी उपस्थित युवा वर्गाला, आशा स्वयंसेविका, यांना राज्यातील रोजगार, राजकीय स्थिती यावर सवाल करत ही लढाई आपल्याला लढाई लढावीच लागेल असे म्हटले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात आल्यानंतर अनेक नागरिक भेटले, सांगत होते की उद्धव ठाकरे यांना सांगा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे.

आपलं सरकार असताना सर्वांना घेऊन पुढे जात होतो. इतरांना खोके देऊन निर्लज्जपणे खुर्चीवर बसणे कितपत योग्य आहे, गद्दारी करून महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार होते, गेला का महाराष्ट्र पुढे ? असा ही सवाल ठाकरे यांनी यावेळी केला.