जयसिंगपूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत जयसिंगपूरातील आदर्श फौंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मुनीर शेख यांनी जयसिंगपूर कोव्हिड सेंटरला साहित्य प्रदान केले. तर लॉकडाऊनच्या काळात काम नसल्यामुळे गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. तसेच आगर येथील कोव्हिड सेंटरमध्ये दोन ऑक्सिजन सिलिंडर ट्रॉली उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच अन्य कोव्हिड सेंटरना आर्थिक स्वरुपात मदत देण्यात आली.

यावेळी फौंडेशनचे अविनाश चौगुले, मुस्ताक सौदागर, अमीन नदाफ, मनोज शहापूरे, नितीन कांबळे, प्रदिप वनमोरे, शेखर चौगुले उपस्थित होते.