कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे गिरगाव येथे धनंजय पोलादे, धनंजय पाटील गोविंद चंदनशिवे, पार्थ देसाई, रवींद्र पायमल, ओंकार येवले आदी कलाकारांच्या सत्कार करण्यात आला.

कलाकार हा नेहमी समाजात जनजागृती घडवत असतो असे मत यावेळी केशवराव भोसले यांचे नातू अशोक पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले की, नुकताच खासदार धनंजय महाडिक यांनी कलाकारांना मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी चंद्रकांत कांडेकरी निवास भोसले, मोहन कोळी, संदीप जाधव सुजय कानकेकर शीतल नलवडे, बापू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.