आय.आय.एस.ई.आर, पुणे (IISER Pune) येथील गरिमा अगरवाल या विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या, तसेच शैक्षणिक फसवणूक करत गरीमाचा शोधप्रबंध दुसऱ्या विद्यार्थींनीच्या नावाने जमा करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ‘अभाविप’ने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गरिमा अगरवाल ही कुशाग्र व होतकरू विद्यार्थिनीने ६ वर्ष अभ्यास करून पीएचडीचा शोधनिबंध पूर्ण केला, परंतु पीएचडी मार्गदर्शकाने (प्राध्यापक) तो शोध एका दुसऱ्या विद्यार्थीनीच्या नावाने जमा केला. प्राध्यापकांकडून विद्यार्थिनीला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यापुढे गरिमाने केलेल्या तक्ररीला दाद ना मिळाल्याने तसेच सततच्या मानसिक त्रासाला कंटाळल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

या प्रकरणावरुन ‘अभाविप’ने आक्रमक होत विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्याच्या हेतूने आवाज उठावला आहे.
ज्या शिक्षण पद्धतीचा विद्यार्थी हा अविभाज्य भाग असतो, त्या शिक्षण पद्धतीत असा दुर्दैवी प्रकार घडणे फार निंदनीय आहे. प्राध्यापक जे मार्गदर्शक असतात त्यांच्याकडून हे भयावह कृत्य घडणे ही फार वाईट परीस्थिती आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत अभावीपणे आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला निवेदणे देत दाद मागितली आहे.

पीडित विद्यार्थीनीची बिकट अवस्था लक्षात घेता जेंव्हा‌ कुटुंबियांनी शिक्षण व्यवस्थेकडे दाद मागितली तेव्हा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिक्षणाच्या सर्व सीमा आणि मर्यादा ओलांडून शिक्षणव्यवस्थेला लाजवणारे कृत्य करण्यात आले. आज या पिडीतेला सहन करावा लागलेला नाहक छळ पुढे कोणत्याही विद्यार्थ्याला सहन करावा लागु नये यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक होणे गरजेचे‌ आहे असे ‘अभाविप’ने म्हटले आहे.

या सर्व प्ररकरणासंदर्भात अभाविपचे कार्यकर्ते आय.आय.एस.ई.आर पुणेचे डायरेक्टर डॉ. जयंत उदगावकर यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी हेतुपूर्वक टाळाटाळ केली तेंव्हा त्यांना आंदोलनाच इशारा देण्यात आला, यापुर्वी देखील अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी तत्सम विषयासंदर्भात चर्चेसाठी वेळ मागितली असता डॉ. जयंत उदगावकरांनी भेटीचे निवेदन फेटाळून लावले.

या विषयावरुन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांच्या उपस्थितीत या घटने संदर्भात निवेदन देण्यात आले. व पिडीतेला लवकरात लवकर न्याय मिळावा ही मागणी अभाविपने केली.