कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील चोवीस तासांत एकूण २०४१ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ११६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. मागील चोवीस तासांत जवळपास २७ हजार जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण संख्येचा आकडा वाढत आहे. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले आणि पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४३६, आजरा-५२, भुदरगड-४०, चंदगड-२७, गडहिंग्लज-९४, गगनबावडा-६, हातकणंगले-२९९, कागल-४८,  करवीर-५३५, पन्हाळा-११८, राधानगरी-६५, शाहूवाडी-३२, शिरोळ-९०, नगरपरिषद क्षेत्र-११८, इतर जिल्हा व राज्यातील-८१ अशा २०४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ५१, ३१९,  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ३५, १७५,  मृतांची संख्या – ४,६१८, उपचार सुरू असलेले रुग्ण – ११, ५२६