कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पंधरवडा दरम्यान मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी विविध ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दिलेल्या ठिकाणी दि.३० सप्टेंबरपर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतिस्वाक्षरीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

कॅम्पची ठिकाणे  :  कोल्हापूर शहर- चेतना विकास मंदिर शेंडा पार्क, करवीर – वि. म. लोहिया मूकबधिर शाळा न्यू महाद्वार रोड, शिरोळ- नवजीवन हायस्कूल जयसिंगपूर, इचलकरंजी- गोविंदराव हायस्कूल इचलकरंजी, हातकणंगले- बळवंतराव यादव हायस्कूल पेठवडगाव, कागल- गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय कागल, भुदरगड- पी. बी. पाटील माध्यमिक हायस्कूल मुदाळ, राधानगरी- नागेश्वर हायस्कूल राशिवडे, गगनबावडा- दत्ताजीराव मोहिते पाटील विद्यालय तिसंगी, पन्हाळा-शाहूवाडी- महात्मा गांधी विद्यालय बांबवडे, ता. शाहूवाडी, गडहिंग्लज- आजरा-चंदगड – माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्था, डॉक्टर कॉलनी गडहिंग्लज.