कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) आणखी २५ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर  दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ९५० जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १६, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोल्हापूरातील शाहूपुरी येथील एका वृद्धाचा आणि न्यू पॅलेस येथील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,६८९.

डिस्चार्ज – ४८,६०३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३३८.

मृत्यू – १७४८.