कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर येथे पोलीस मुख्यालयातील पेट्रोल पंपावर एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री सव्वा बाराच्या सुमारास संशयित गाडीत इंधन भरण्याच्या निमित्ताने पट्रोल पंपावर आले आले होते. दरम्यान गुगल पे नसल्याच्या कारणावरुन इंधन भरताना बाचाबाची झाली अन् यातूनच संशयितांनी मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. 19 डिसेंबर रोजी रात्री सव्वाबारा वाजता हे प्रकरण घडलं असून, गूगल पेच्यानिमित्ताने वाद सुरु झाला हा वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला सहा संशयितांनी मारहाण केली. असल्याची माहिती समोर आली असून, पोलिस कर्मचारी अल्ताफ कुरेशी आणि कर्मचारी किरण आवळे हे यात जखमी झाले आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित परशुराम उर्फ बबलू बाळू बिरंजे ( वय 24 , रा. विश्वशांती चौक कनाननगर, कोल्हापूर ), बालाजी गोविंद देऊळकर ( 23 , रा. विठ्ठल रुक्मिणी नगर पवार कॉलनी, पाचगाव, ता. करवीर ), सुरज उपेंद्र शिरोलीकर ( 22 , रा. धरती माता हाऊसिंग सोसायटी विचारेमाळ, कोल्हापूर ), पृथ्वीराज संदीप शिंदे ( 19, रा. कदमवाडी, कोल्हापूर ) यांना अटक केली आहे.