नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) प्रांजली अवस्थी या 16 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीने AI स्टार्टअप कंपनी सुरु केली असून, या कंपनीची किमत 3.7 कोटी आहे. प्रांजलीच्या या कंपनीचे मूल्य 100 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. मियामी टेक वीक इव्हेंट दरम्यान प्रांजलीने आपल्या स्टार्टअपच्या मदतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रांजली सध्या अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहते.


मिळालेल्या माहितीनुसार प्रांजली सध्या अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहते. कुटुंब भारतातून स्थलांतरित होऊन फ्लोरिडामध्ये स्थायिक झाले तेव्हा तिचे वय 11 वर्ष होते. प्रांजलीचे वडील एक अभियंता (इंजिनिअर) असून शाळेत मुख्य शिक्षणासह मुलांना संगणक विज्ञान देखील शिकवले पाहिजे अशा मतांचे ते आहेत.


प्रांजली 13 वर्षांची असताना इंटर्नशिप दरम्यान युनिव्हर्सिटी रिसर्च लॅबमधून आपल्या स्टार्टअप कंपनीची कल्पना सुचली. कोरोना काळात हायस्कूलमध्ये व्हर्च्युअल शिकवले जात होते, त्यामुळे प्रांजलीला आठवड्यातून सुमारे 20 तास इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली.

या अंतर्गत ती रिसर्च करायची, डेटा काढायची आणि साहित्य परीक्षणे तयार करायची. OpenAI ने 2020 मध्ये ChatGPT-3 ची बीटा आवृत्ती जारी केली तेव्हा, प्रांजलीने डेटा सहजपणे काढण्यासाठी आणि सारांशित करण्यासाठी त्याचा वापर केला.