कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ५ मृत्यू झाले असून १०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १९, आजरा – ०, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – ५, गगनबावडा – ०, हातकणंगले – ११, कागल – ३, करवीर – १०, पन्हाळा – ५, राधानगरी – ४, शाहूवाडी – १, शिरोळ – ६, नगरपरिषद क्षेत्र –१५ इतर जिल्हा व राज्यातील – ५ अशा ८२ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –
एकूण रुग्ण – २, ०५, १३९
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९८, २७१
मृतांची संख्या – ५, ७२८
उपचार सुरू असलेले रुग्ण – १, १४०