कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस १३३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ९०५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४६४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ३८, आजरा तालुक्यातील ३,चंदगड तालुक्यातील १०, गडहिंग्लज तालुक्यातील ८, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १,  कागल तालुक्यातील ९, करवीर तालुक्यातील ८, पन्हाळा तालुक्यातील ६, राधानगरी तालुक्यातील ४, शाहूवाडी तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २३ आणि इतर जिल्ह्यातील १७ अशा एकूण १३३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ९०५ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील गंगावेश येथील १, प्रतिभा नगर येथील १, महाद्वार रोड येथील १, आजरा तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २, सांगली जिल्ह्यातील १ अशा ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४५,७२८.      

एकूण डिस्चार्ज ३६,५०८.

उपचारासाठी दाखल रुग्ण ७७२३.

आजअखेर एकूण मृत्यू १४९७ झाले आहेत.