कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेतर्फे रंकाळा चौपाटी परिसर, पंचगंगा घाटासह शहरातील विविध ९ ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत नवे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे याही सक्रिय झाल्या होत्या.

महानगरपालिका आणि विविध सेवाभावी,स्वयंसेवी संस्‍थांच्या सहकार्याने शहरात सुरु असलेल्या आजच्या ७७ व्या स्वच्छता मोहिमेत २ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. रंकाळा टॉवर चौपाटी परिसर, पंचगंगा घाट परिसर,हुतात्मा पार्क,पंपहाऊस परिसर तसेच खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय,जयंती नदी पंपिंग स्टेशन,शेंडा पार्क ते सायबर चौक,डीएसपी चौक ते भगवा चौक,हॉकी स्टेडियम ते शेंडा पार्क,हुतात्मा पार्क परिसर व कावळा नाका ते तावडे हॉटेल मेनरोड अशा एकूण नऊ ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ,सुंदर करण्यात आला.

स्वच्छता मोहिमेत चार जेसीबी,आठ डंपर,तीन आरसी गाडया,२ औषध फवारणी टँकर व २ पाण्याचे टँकरचा वापर करण्यात आला. तसेच महापालिकेच्या ९० स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने तसेच शहरातील विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्‍थांच्या सहकार्याने मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई,आरोग्यधिकारी डॉ. अशोक पोळ,उपशहर अभियंता एन. एस. पाटील,बाबुराव दबडे,रामचंद्र काटकर,मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार,विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर,आयईसी इनचार्ज निलेश पोतदार,स्वच्छता दूत अमित देशपांडे,एकटी संस्था कर्मचारी,आरोग्य निरिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.