कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने दि. १९ व २० जुलै रोजी शहरात अवैध, अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलक इत्यादी हटविणेकिरता विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये शहरामधील ६४ अनधिकृत जाहिरात फलक जप्त करण्यात आले आहे.

दि. २० जुलै रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आढळलेले अनाधिकृत फलक लावणा-या संबंधितावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत तसेच महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५, कलम ३,४ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाच्या दि.३१ जानेवारी २०१७ रोजीच्या आदेशान्वये अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात येत आहे. तरी संबंधित नागरिकांनी शहरामध्ये तात्पुरत्या स्वरुपातील अथवा अधिक कालावधीसाठी विनापरवाना अनधिकृत जाहिरात, शुभेच्छा, श्रध्दांजली यासारखे फलक लावू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.