कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात पोलीस खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १ हजार ६१ पोलिसांना पदोन्नती देण्यात आली. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ५ पोलिसांचा समावेश आहे. पोलीस महासंचालकांनी त्यांच्या पदोन्नतीपाठोपाठ त्यांच्या बदलीचे आदेश काढले.
रमेश पंडीत ठाणेकर (शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन), चंद्रकांत श्रीपती भोसले (करवीर पोलीस स्टेशन), यशवंत शामराव उपराटे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कोल्हापूर) इकबाल गुलाब महात (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर), विलास बळीराम भोसले (पासपोर्ट विभाग, कोल्हापूर) यांना बढती देऊन त्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झालेली आहे.