कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी थोडी विश्रांती घेत पावसाची बॅटिंग सुरूच राहिली. काही काळ सूर्यदर्शनही झाले. राधानगरी धरणात १३०.२४ दलघमी पाणीसाठा आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली आहेत. सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ३३.७ फुटावर आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगाव व सरुड पाटणे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगाव, खोची व मांगले सावर्डे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकूड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे असे ४५ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे : राधानगरी- १३०.२४ दलघमी, तुळशी- ५२.९० दलघमी, वारणा -५३४.१२ दलघमी, दूधगंगा- ३२९.६० दलघमी, कासारी- ५१.९८ दलघमी, कडवी- ४१.१५ दलघमी, कुंभी- ४३.५६ दलघमी, पाटगाव- ५७.७५ दलघमी, चिकोत्रा- २३.६५ दलघमी, चित्री- २५.९१ दलघमी, जंगमहट्टी- १९.६६ दलघमी, घटप्रभा- ४४.१७ दलघमी, आंबेआहोळ- २३.७२ जांबरे मध्यम प्रकल्प- व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे : राजाराम- ३३.०७ फूट, सुर्वे- ३२ फूट, रुई- ६१.०९ फूट, इचलकरंजी- ५८ फूट, तेरवाड- ५२ फूट, शिरोळ- ४४ फूट, नृसिंहवाडी- ४२ फूट, राजापूर-३१.०९ फूट, सांगली- १७.०६ फूट व अंकली २१.०९ फूट अशी आहे.