कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील चोवीस तासांत २९९ जणांना कोरोनाची लागण झाली असून पाचजणांचा मृत्यू झाला आहे. आज (मंगळवार) दिवसभरात १८१ जण बरे झाले असून १८१६ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरातील ११६, आजरा तालुक्यातील ९, भुदरगड तालुक्यातील ३, चंदगड तालुक्यातील ३, गडहिंग्लज तालुक्यातील १८, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २१, कागल तालुक्यातील ८, करवीर तालुक्यातील ३७, पन्हाळा तालुक्यातील ११, राधानगरी तालुक्यातील १०, शाहूवाडी तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४२ आणि इतर जिल्ह्यातील १४ अशा २९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, इचलकरंजी येथील १ आणि पुणे येथील १ व रत्नागिरी जिल्ह्यातील १ अशा पाचजणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याची आजअखेरची स्थिती – :

एकूण रुग्ण – ५५, ००२, डिस्चार्ज – ५०, ६५३, उपचारासाठी दाखल रुग्ण – २५२१, मृत्यू – १८२८.