कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगार आणि कर्मचाऱ्यांना शेल्टर असोसिएटस संस्थेच्यावतीने २५ हजार साबण महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.

येथील शेल्टर असोसिएटसच्या संचालिका प्रतिमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसेफ व हिंदुस्थान युनीलिव्हर लिमिटेडच्या सहकार्याने कोरोना महामारीच्या काळामध्ये प्रत्येकाने वेळोवेळी  साबणाने हात धुवावे यासाठी कोल्हापूर शहरातील २५ झोपडपट्यामध्ये प्रत्येक कुटुंबास साबण देण्यात येत आहेत. आज या संस्थेने महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगार व कर्मचाऱ्यांसाठी देखील २५ हजार साबण आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केले, यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय पाटील, शेल्टर संस्थेचे प्रतिनिधी शंकर श्रीमंगले, गायत्री पवार, नीता देशमुख  उपस्थित होते.