पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षा लागवड करण्याबरोबरच वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वीरशैव लिंगायत समाजाच्यावतिने शाहू जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर परिसरातील वीरशैव रूद्रभूमी (स्मशानभूमी) येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे हे होते. यावेळी विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात… Continue reading पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज : ना. हसन मुश्रीफ

‘हेरले’साठी तुम्ही हाक द्या मी साथ देतो : राजेंद्र पाटील-यड्रावकर 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हेरले गावासाठी तुम्ही हाक द्या, मी साथ देतो अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हेरले ग्रामस्थांना दिली. ते राजर्षी शाहू जयंती निमित्त हेरले येथील लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात १८२ युवकांनी रक्तदान केले. हेरले येथील लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष इकबाल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले.… Continue reading ‘हेरले’साठी तुम्ही हाक द्या मी साथ देतो : राजेंद्र पाटील-यड्रावकर 

शाहू महाराज जयंती राष्ट्रवादी शहर कार्यालयामध्ये उत्साहाने साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांची जयंती साधेपणाने पण उत्साहाने साजरी करण्यात आली. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पक्षाचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, पैलवान विष्णू जोशीलकर, सुनील पाटील, आदिल फरास, प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आर के पोवार… Continue reading शाहू महाराज जयंती राष्ट्रवादी शहर कार्यालयामध्ये उत्साहाने साजरी

पुणे पोलिस उपायुक्‍त घट्टे यांचे विद्यापीठात उद्या व्याख्यान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद अधिविभागातील पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सोमवार दि. २८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता पुण्याचे पोलिस उपायुक्‍त मितेश घट्टे यांचे ‘गुन्हेगारी बातम्या आणि पत्रकारांची जबाबदारी’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे, अशी माहिती अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली. इस्लामपूर येथील राजारामबापू… Continue reading पुणे पोलिस उपायुक्‍त घट्टे यांचे विद्यापीठात उद्या व्याख्यान

सोमवारपासून राजारामपुरी, महाद्वार रोडवरील दुकाने उघडणारच ! : व्यापाऱ्यांचा निर्णय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील रुग्णसंख्या सरकारी निकषांप्रमाणे तिसर्‍या श्रेणीमध्ये आलेली आहे. सुमारे अडीच महिन्याच्या लॉकडाऊनमुळे व्यापार्‍यांचे कंबरडे मोडले आहे, आता ही स्थिती सहन करणे शक्य नाही त्यामुळे सोमवार दि. २८ पासून राजारामपुरी व महाद्वार रोडवरील दुकाने उघडून व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने कारवाई केल्यास त्याला सामूहिकरीत्या प्रतिकार करून कारवाईला सामोरे जाऊ, अशा… Continue reading सोमवारपासून राजारामपुरी, महाद्वार रोडवरील दुकाने उघडणारच ! : व्यापाऱ्यांचा निर्णय

जलसमाधीचा इशारा देणारा आंदोलकच गायब, प्रशासनाची उडाली भंबेरी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उचगाव-वळीवडे हद्दीतून जाणाऱ्या ओढ्यावरील अतिक्रमणप्रश्नी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे किंवा नायब तहसीलदारांची बैठकीसाठी प्रतीक्षा करत असतानाच जलसमाधीचा इशारा देणारे आंदोलक राजू कांबळे शुक्रवारी अचानक गायब झाल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. त्यांची रात्री शोधाशोध सुरू झाली. जलसमाधी घेण्यासाठी निगडेवाडी येथील पंचगंग नदीच्या घाटावर गेलेल्या कांबळे यांना वाहतूक सेनेच्या रामभाऊ साळोखे यांनी पकडले व सहकाऱ्यांच्या… Continue reading जलसमाधीचा इशारा देणारा आंदोलकच गायब, प्रशासनाची उडाली भंबेरी…

तिरपण येथे राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मास्कचे वाटप…

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील तिरपण येथे राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने छ. शाहूंच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शाहू जयंती साजरी करण्यात आली. ‘मास्क वापरा कोरोना टाळा’ अशा घोषणा देत संपूर्ण गावात दोन हजार मास्कचे वाटप केले. यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष अमित यादव, खजानिस… Continue reading तिरपण येथे राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मास्कचे वाटप…

‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने गोवा सरकारने केली राज्याची सीमा सील…

पणजी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण मिळाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून त्याची लागण  लागण झालेले रुग्ण गोव्यात येऊ नये म्हणून गोवा सरकारने सीमा मार्गावर कडक तपासणी सुरू केली आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज (शनिवार) स्वत: काही चेक नाक्यावर भेट देऊन पाहणी व तपासणीचा आढावा घेतला.  मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, डेल्टा प्लसची… Continue reading ‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने गोवा सरकारने केली राज्याची सीमा सील…

शाहूकालीन चहाची मळी परिसरात राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन…

बोरपाडळे (प्रतिनिधी) : लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीच्या विकासाचे प्रतिक असणाऱ्या मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक चहाची मळी परिसरात छ. शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्रीकृष्ण विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष खांडेकर, उद्योजक दीपक दाभोळकर, माजी उपसरपंच धोंडीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. छ.… Continue reading शाहूकालीन चहाची मळी परिसरात राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन…

शिरोली येथे भाजपाचे चक्का जाम आंदोलन…

हातकणंगले / टोप (प्रतिनिधी) :  ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवावे, या मागणीसाठी भाजपातर्फे हातकणंगले तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली येथे आज (शनिवार) चक्का जाम आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ  घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सतिश पाटील, तालुका सरचिटणीस भूपाल कांबळे, ऋषिकेश सरनोबत, धनाजी लोहार, शिवाजी पाटील, सौरभ पाटील, कृष्णात पाटील, विश्वास… Continue reading शिरोली येथे भाजपाचे चक्का जाम आंदोलन…

error: Content is protected !!