कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या वतीने आज (सोमवार) मोबाईल व्हँनद्वारे राबविण्यात आलेल्या कोरोना अँन्टीजन टेस्ट मोहिमेत अवनी संस्थेमधील ६ ते १८  वयोगटातील १५ मुलींसह दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत.

सकाळी या संस्थेमधील दोन ते तीन मुलींना ताप आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बालकल्याण समिती मार्फत महापालिकेच्या वतीने संस्थेमध्ये अँन्टीजन टेस्ट करण्यात आली. यावेळी १५ मुली आणि २ कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.