कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आज कालच्यापेक्षा थोडा कमी झाला असून गेल्या चोवीस तासात १,७५९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात  १,५५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारासाठी एकूण दाखल रुग्णसंख्या १५ हजार ४३३ इतकी आहे.

काल ( शनिवारी) हि संख्या २,२१९ इतकी होती. तर ४० जणांचा मृत्यू झाला होता. कालच्या मानाने आज आकडा कमी आल असला तरी लागण होणाऱ्यांची संख्या अजूनही मोठी आहे.