कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मागील चोवीस तासांत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३०८ जणांना लागण झाली आहे. दिवसभरात ९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १६२६ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  

कोल्हापूर शहरातील १६१, आजरा तालुक्यातील ६, भुदरगड तालुक्यातील ७, चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १२, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १९, कागल तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील २९, पन्हाळा तालुक्यातील १०, राधानगरी तालुक्यातील ७, शाहूवाडी तालुक्यातील आत्तुर येथील ३, शिरोळ तालुक्यातील १५, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २६ आणि इतर जिल्ह्यातील ८ अशा एकूण ३०८ जणांना लागण झाली आहे.

कोल्हापुरातील नाना पाटीलनगर येथील ४० वर्षीय महिला, रंकाळा येथील ३८ वर्षीय महिला, साने गुरुजी वसाहत येथील ६७ वर्षीय महिला, तपोवन, कळंबा येथील ७० वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष, चंदगडमधील ४० वर्षीय महिला, शाहूवाडी तालुक्यातील ८० वर्षीय महिला, येळाणे येथील ६६ वर्षीय पुरुष, पन्हाळा तालुक्यातील नावली येथील ६५ वर्षीय पुरुष, जाखले येथील ७० वर्षीय महिला आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ७५ वर्षीय महिला अशा १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – ५४, ७०३, डिस्चार्ज – ५०, ४७२, उपचारासाठी दाखल रुग्ण – २४०८,  मृत्यू – १८२३.