कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक आणि सांस्कृतिक वसा घेऊन चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशनने पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देऊ केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरमधील सर्व शुटिंग बंद असल्याने टेक्निशियन आणि इतर लोकांचे खूप हाल होत आहेत.

यावेळी कलाक्षेत्रातील स्पॉटबॉईज, सुतारकामगार, ज्यु. आर्टिस्ट, लाईटमन अशा गरजु कलाकार तंत्रज्ञानांच्या कुटुंबियांना एक महिन्याचे किराणा पुरेल इतके धान्य या फौंडेशनतर्फे देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गरजु कलाकारांच्या कुटुंबियांना हातभार लागला आहे.

यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष संदिप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव- भालकर, विजय कांबळे, अशिष हेरवाडकर, भुषण पाठक, आकाश लिगाडे, आराधना सावंत, काजल महाजन, रेवती जरग, सुवर्णा झुंबुरे, सुरेखा राणे, राजीव पाटील, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर उपस्थित होते.