मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे कोल्डवार संपायच नाव घेत नाहीय. जेव्हा पासून मुख्यमंत्री शिंदेनी ठाकरे गट सोडला आहे. तेव्हा पासून शिंदे – ठाकरे गटात धुसपुस सुरु आहे. दोन्ही गटातील बडे नेते एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाही. अनेक गौप्यस्फोट, खुलासे देखील होत आहेत अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिवंगत आनंद दिघे आणि उद्धव ठाकरेबाबत मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे..?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कात प्रचार सभा घेतली. यावेळी राज ठाकरेही उपस्थितीत होते. यावेळी राज ठाकरेंनी दिवंगत आनंद दिघे यांच्या सोबत आठवणी ताज्या केल्या या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना एका मुलाखतीत दिघे आणि राज ठाकरेंचे संबंध कसे होते? हे विचारले असता, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ”खूप चांगले संबंध होते. या चांगल्या संबंधांमुळे दिघे साहेब अनेक वेळा अडचणीत आले. राज ठाकरे काम करणारा माणूस. कधी कधी दिघे साहेब राज ठाकरेंबद्दल चांगेल बोलायचे. त्यांची बाजू लावून धरायचे. मग हे जे लोक त्यांना ते आवडायचं नाही. मग ती पोटदुखी व्हायची.
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिघे साहेबांनाही मानसिक त्रास दिला. त्यांची एवढी लोकप्रियता होती. सभा, भाषण न देता एवढी लोकप्रियता मिळवणे सोपं काम नव्हतं. याबद्दल त्यांना मत्सर होता. नेतृत्त्वावर विश्वास स्वत:चा नसला की या सगळ्या गोष्टी घडतात. त्यांनीही दिघे साहेबांना खूप मानसिक ताप दिला. त्यांनी बरंच काही गोष्टी केल्यात. त्यांनी दिघे साहेबांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घालविण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचे संबंध खूप प्रेमळ आणि गुरु-शिष्याचे होते. हे जे बाकी लोक जे आहेत, त्यांना दिघेसाहेबांची लोकप्रियता सलत होती.” आता या आरोपांवर ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.