वारणानगर (प्रतिनिधी) : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे, वारणा साखर संचलित आमदार डॉ. विनय कोरे कोरोना केअर सेंटरचा प्रारंभ आ. डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. आजपासून कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सायन्स पार्क नजीक इमारतीत सुरू झाली आहे.
आ. कोरे म्हणाले की, देशासह संपूर्ण राज्यात मार्चपासून थैमान घातलेल्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपण सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. वारणेतील कोरोना केअर सेंटर रूग्णांना आधार वाटावा आणि मानसिक स्थिती चांगली राहवी, या दृष्टिकोनातून हे केअर सेंटर उभारण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष समित कदम, सभापती तेजस्विनी शिंदे, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शिंगटे, डॉ. जयवंत पाटील, डॉ. बसवराज देशमुख, डॉ. प्रतापसिंह बच्चे, डॉ. प्रशांत जमने, अॅड.राजेंद्र पाटील, वासंती रासम आदी मान्यवर उपस्थित होते.