मुंबई (प्रतिनिधी) : जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जावळकर यांचे आज (रविवार) निधन झाले.  त्या ८८ वर्षांचं होत्या. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशके त्यांनी रूपेरी पडद्यावरती गाजवली आहेत. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. शशिकला यांनी शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शशिकला या बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. त्यांचा ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. शशिकला यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.