मुंबई – सध्या देशांत लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक काही दिवसातच येऊन ठेपली असता, दुसरीकडे कडे विरोधी पक्ष नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी प्रहार करत फुसका बार म्हणत उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले आहे.

नारायण राणे म्हणाले की,उद्धव ठाकरे यांना काय कळतं, उद्धव ठाकरे म्हणजे फुसका बार, अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले. ते मातोश्रीच्या बाहेर पडलेचं नाहीत. जो माणूस मंत्रालयात जाऊ शकत नाही, त्यांनी लोकांच्या हिताचं कोणतं काम केलं, असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. नारायण राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, पाच किलो कुणाला धान्य दिलं का? उलट केंद्र सरकारकडून कोरोना काळात औषधासाठी पैसे आले त्यात 15 टक्के कमिशन खाल्लं, त्याची चौकशी सुरू आहे. याला जवळ घेऊ नये, मी नाय सोडणार, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात प्रहार केला आहे. आता यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावर काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे म्हणत्वाचं असणार आहे.