कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवासेना जिल्ह्याच्या वतीने 26/11 च्या भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि भारतीय नागरिकांना कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक इथे आज (गुरुवार) आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी शिवसेना चित्रपटसेना कार्याध्यक्ष सुशांत शेलार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नूतन अध्यक्ष धनाजी यमकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सुहास पोवार, उपशहरप्रमुख सनराज शिंदे, शेखर बारटक्के, अभिनयन कानकेकर, विभागप्रमुख वैभव जाधव आदी उपस्थित होते.