गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील आम आदमी पार्टी पक्षाच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम गडहिंग्लजचे आराध्यदैवत असणाऱ्या श्री काळभैरीच्या डोंगर परिसरात राबविण्यात आला.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे… वनचरे.. !’ असो किंवा ‘कांदा मुळा भाजी अवधी विठाई माझी’ असो… संतांनी खूप आधीपासूनच निसर्गाची महती त्यांच्या शब्दातून भावबद्ध केली आहे. सृष्टीच्या या अफाट चक्रात प्राणी आणि वनस्पती यांचे एक अतूट नाते आहे. आता हे चक्र अखंडित चालू ठेवायचे झाल्यास वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. काळाची गरज ओळखून समाजातील अनेक संस्था, संघटना, व्यक्ती विविध गोष्टींच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात येते.

रा. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘आप’चे जिल्हा प्रमुख नीलेश रेडेकर, सचिव दिगंबर पाटील, शहर अध्यक्ष राघव कोळी, श्रीकांत शिंदे, शिवानंद पाटील, सुमित धाकोजी आणि आम आदमी पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.