मुंबई (प्रतिनिधी) : संजय राऊत सार्वजनिक बोलले, मात्र मी समोर असताना बोलले नाहीत. संजय राऊत डॉक्टर आहेत. त्यामुळे मी वेगळा डॉक्टर न शोधता त्यांच्याकडेच जातो म्हणजे आमचा जरा संवाद देखील होईल. यावेळी संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली, तर मी त्यांचं डोकं तपासेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

मी आता चंद्रकांत पाटलांनी शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणं ही दुःखद घटना असेल, तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल, तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, असे शिवसेना खा. संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर पाटील यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.