कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातील न्यायाधीशांच्या निवास स्थानाजवळील असणारे सुमारे १० हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महादेव शिवगोंडा पाटील (वय ५७, रा. पोलीस मुख्यालय) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कसबा बावडा रोडवरील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातील न्यायाधीशांच्या निवास स्थनाजवळील चंदनाचे झाड रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कापून लंपास केले. ही बाब निदर्शनास येताच महादेव पाटील यांनी अज्ञात चोरट्यांन विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.