मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने येत्या रविवारी म्हणजे २५ ऑक्टोबरपासून राज्यात जिम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले जिम पुन्हा सुरू होतील.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या अनलॉकमध्ये जिम बंद होते. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती पूर्ववत चालू करावेत, अशी वारंवार मागणी होत होती. त्याची दखल घेत आणि कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिम उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. पण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिम सुरू करता येणार आहे.