टोप (प्रतिनिधी) : टोप गावात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून गावातील सर्वच भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे आज (बुधवार) दक्षता समितीच्या झालेल्या बैठकीत अत्यावश्यक सेवा वगळुन गावात १२ जून पासून दहा दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

टोप गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १०० जणांना कोरोनाची लागण झाली असून काही संशयित रुग्ण आहेत. यामुळे पुढील धोका लक्षात घेवून टोप गाव दहा दिवस कडक बंद पाळण्याचे यावेळी ठरले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक आणि दंडात्मक कारवाईही करण्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यावेळी सरपंच रुपाली तावडे, दक्षता समिती अध्यक्ष संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, विश्वास कुरणे रंजना पाटील, अंजना सुतार, बाळासो कोळी, विनोद पाटील, उत्तम पाटील, ग्रामविकास अधिकारी डी.आर.देवकाते, ग्रा.पं. सदस्य, दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.