कागल (प्रतिनिधी ) : कागल येथील महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आणुर गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला गोकुळ दूध संघाचे संचालक .नविद मुश्रीफ मार्गदर्शन करताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी कागल विधानसभा मतदारसंघातून प्रा.संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करु.

यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, येत्या ४ मे रोजी आपण सर्वांनी प्राचार्य संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील बिद्री साखर कारखान्याचे संचालक पै.रविंद्र पाटील बानगेकर, राजश्री चौगुले, दत्तात्रय कोईगडे, सुभाष भोसले, आप्पासाहेब भांदिगरे, बाळासाहेब चौगुले, दत्तात्रय आरडे, डॉ. एन. आर. पाटील, उमेश पाटील, मारुती माने, राजेंद्र आरडे, विजय पाटील, तातोबा गोते सर, हिंदुराव नरके, संजय बेनाडे, पांडुरंग खेडे, अनिल सुर्वे, सदानंद कुंभार, बाळासो लंबे, आनंदा लोहार, काकासो तोडकर, अरविंद नरके, विजय भोळे, प्रकाश मुरगुडे, प्रकाश पाटील, शशिकांत आरडे, बाळासो नरके, शिवाजी लोहार, प्रकाश बेनाडे, सुवेश चौगुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.