कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कुरणी, ता.कागल येथे आयोजित महायुतीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य मनोज फराकटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या विविध योजना राबवल्या आहेत. गोरगरिबांसाठी व देशाच्या विकासासाठी काम करणाऱ्या नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी प्रा.संजय मंडलिकांना साथ द्या.

यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील म्हणाले, कोल्हापूरचा खासदार म्हणून संजय मंडलिक यांनी केंद्र व राज्य शासनाकडे निधीचा पाठपुरावा करून मोठी विकास कामे आणली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी 800 कोटी रुपयांचा निधी आणला.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ साहेब, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, ईगल प्रभावळकर, सुधीर पाटोळे, सुनील सूर्यवंशी, , डी.एम.चौगले, बाळासो तुरंबे, दत्ता पाटील केनवडेकर, भगवान पाटील, विलास पाटील, सरपंच सिद्धगोंडा पाटील, रवींद्र मांगोरे, सदाशिव पावले, आनंदा पाटील, शिवाजी माने, पांडुरंग रणदिवे, दत्तात्रय पालवे, व्ही.एम. पाटील सर, दिनकर पाटील, संजय शेंडे, भिमराव पाटील, सर्जेराव पाटील, श्रीकांत पाटील, संदीप पाटील, महादेव हंचनाळे, नंदकुमार गुरव, सुरेश कोरे, अरुण सुतार, सुरेश प्रभावडे, महादेव हंचनाळे, विक्रम कांबळे, व महायुतीचे प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.