मनोरंजन ( प्रतिनिधी ) सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘आर्य 3’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून या मालिकेच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे. ‘आर्य 3’ प्रमोशनदरम्यान सुष्मिता सेनही तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत स्पॉट झाली होती. रोहमन आणि सुष्मिताला एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत.


2021 मध्ये रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता सेनचे नाव बिझनेसमन ललित मोदीसोबत जोडले जात होते. ललित मोदींनी आपल्या सोशल मीडियावर अभिनेत्री सोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या नात्याबाबत इशारा दिला होता. मात्र, काही वेळाने तीने आपला फोटो डिलीट केला, त्यानंतर ललित मोदी आणि सुष्मिता सेन आता एकत्र नसल्याचा अंदाज बांधला जात होते.


बिझनेसमन ललित मोदीसोबत कथित ब्रेकअप झाल्यानंतर ‘आर्य 3’ अभिनेत्रीचे नाव पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत जोडले जाऊ लागले. याआधी दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, ब्रेकअपनंतर सुष्मिता सेनने ती आणि रोहमन चांगली मैत्री असल्याचे स्पष्ट केले होते.