कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘नो मास्क नो एन्ट्री’ ही मोहिम शहरात कठोरपणे राबवू. अशी ग्वाही चेंबर ऑफ कॉमर्ससह शहरातील सर्व व्यापारी असोसिएशन आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला आज (बुधवार) दिली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत चेंबर ऑफ कॉमर्स तसेच शहरातील विविध व्यापारी संघटनाची बैठक उपायुक्त निखिल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ही ग्वाही देण्यात आली.

यावेळी नगरसेवक किरण नकाते, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, सुनिल जाधव, बशीर मकानदार, राजेंद्र पाटील यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्सचे वैभव सावर्डेकर, कोल्हापूर कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील व्यापारी असोसिएशन, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.