मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राज्यातील प्रचाराचा झांजावंत सुरू असताना अचानक त्यांचे आजचे सरव कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार गेल्या 20 दिवसांपासून ते प्रचारात स्वत:ला झोकून देऊन काम करत होते. . रविवारी (5 मे) बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी झालेल्या सांगता सभेत शरद पवार यांनी अगदीच चार ते पाच मिनिटे भाषण केले. या सभेत बोलताना त्यांच्या आवाजात कातरपणा जाणवला. तसेच, घसा बसल्याने त्यांना शब्दही नीट बोलता येत नव्हते. शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे आजचे त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

प्रचारमुळे शरद पवार यांचा घसा बसला असून प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. अंदर रोहित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली यानंतर त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना त्यांची प्रकृती स्थीर असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, त्यांचे आज बीडमधील दौरेही रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर, बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी फेसबुक पोस्ट लिहून शरद पवारांना तब्येतीला जपा असे आवाहन केलंय.

बजरंग सोनावणे यांनी रविवारी रात्री उशिरा ट्वीट करताना म्हटले की, शरद पवार तुम्ही तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला येणार नाही समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही. तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. त्या तुमच्या नावावरच झाल्या.

मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो आहे, पण शरद पवार आता तुम्ही आमचं ऐका, ही खिंड आम्हालाच लढू द्या. विपरीत परिस्थितीत लढणं हे तुम्ही या देशाला दाखवून दिलं आहे. त्यामुळे विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो. आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच आम्हाला लढू द्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे आणि तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहु द्या, असे भावनिक ट्वीट बजरंग सोनावणे यांनी केले आहे.

बजरंग सोनावणेंची फेसबुक पोस्ट

साहेब, तब्येतीला जपा!
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही…

तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.

लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.

~ तुमचा,
बजरंग बप्पा!