नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हरियाणातील हिसार जिल्ह्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 6 मुली व 9 तरुणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपी, राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि महेंद्रगडमधील महिला या अनैतिक कृत्यांमध्ये सामील आहेत. एडीजीपी हिसार विभाग हिसार कार्यालयातील गुप्त माहितीच्या आधारे, डीएसपी विनोद यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाने तनिष्क हॉटेलजवळील शीश महल जिंदाल रोडवर अनैतिक घटनांच्या संदर्भात छापा टाकला. तेथून रावळवास येथील हॉटेलचालक प्रदीप आणि पडव चौकातील अनिलसह 9 जणांना अटक करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत 4 महिला आणि 1 तरुणाला घेतले ताब्यात..!
डीएसपी विनोद शंकर यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या पथकाने एलिट स्पा सेंटर जिंदाल चौकाजवळ छापा टाकला. येथून पथकाने 4 महिला आणि 1 तरुणाला अनैतिक आणि संशयास्पद कारवायांसाठी अटक केली.
मिलगेट येथील हॉटेल मालक पवन याने ते 22 हजार रुपये दराने एक वर्षासाठी भाड्याने घेतले आहे. येथे छापा टाकून अनैतिक कृत्य करणाऱ्या चार महिलांसह एकाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये दोन दिल्लीतील आणि एक महेंद्रगड येथील आहे.