कळे (प्रतिनिधी) :  आम्ही आजपर्यंत कोणत्याही विकासकामाला खीळ घातली नाही, सरपंच आम्हाला यात गोवत आहेत. असा खुलासा जि.प. सदस्य शंकर पाटील आणि कोतोलीचे सरपंच राजेंद्र लव्हटे, सदस्यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना केला.

पन्हाळा तालुक्यातील कोतोली ग्रामपंचायतमधील सध्या विकास कामांच्या बाबतीत ग्रा.पं. पदाधिकारी यांच्यात वादंग सुरू झाला आहे. सध्या सरपंच पी. एम. पाटील यांनी विकासकामात ग्रा.पं. पदाधिकारीच सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत उपोषण सुरू केले आहे.

शंकर पाटील म्हणाले की, आमचा गेल्या तीन वर्षांतील संपूर्ण कारभार हा अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी आहे. त्यामुळे ग्रा.पं. मधील कोणत्याही रजिस्टरची कोणीही, कधीही चौकशी करु शकता. तसेच सध्याच्या सरपंचांचा मनमानी कारभार सुरु असुन त्यांनी आजपर्यंत मोठा ठपला पाडला आहे. ते लपवण्यासाठी त्यांचे स्टंट सुरू आहेत, असा आरोप शंकर पाटील यांनी केला.

शंकर पाटील यांनी यावेळी, गावाच्या विकासासाठी आणि एकोपा टिकवण्यासाठी आपण यासाठी सदैव तत्पर आहे. आजपर्यंत गावासह भागात अनेक कामे मंजूर करुन आणली आहेत. या पुढेही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देऊ. पण, जिथे चुकीचे दिसत आहे त्याला विरोध करणार असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय पाटील, प्रशांत पाटील, पांडुरंग गांजवे, बबन कांबळे  आदी उपस्थित होते.