कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या चेअरमनपदी कोल्हापूरचे माजी महापौर सागर प्रल्हाद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. काल (गुरुवार) औरंगाबाद येथे पार पडलेल्या संघटनेच्या तिसऱ्या वार्षिक सभेत त्यांची निवड झाली. याबद्दल कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशनने चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.