बुलडाणा (प्रतिनिधी) : सोयाबीन दरासाठी उपोषण करणारे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची तब्बेत खालावल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्याने अंगावर रॉकल ओतून पेटविण्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. त्यानंतर संतप्त आंदोलकांकडून तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला.

बुलडाण्यात  गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यानंतर आंदोलकांनी  चिखली – बुलडाणा राज्य महामार्गवर रास्ता रोको करण्यात आला. तर दुसरीकडे पोलिसांची गाडी फोडण्यात आली असून तहसीलदारांचे वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.